मुंबईत प्रचाराच्या तोफा थंडावल्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Share This
मुंबई-ठाणे परिसरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कानीकपाळी आदळणाऱ्या प्रचारतोफा अखेर मंगळवारच्या संध्याकाळी थंडावल्या.'मत' संग्रामात उतरलेल्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी गेल्या दोन आठवड्यांहून अधिक काळ सकाळ-संध्याकाळ गल्ली ते हमरस्ते आणि झोपड्या ते टॉवर असा प्रचार करत मुंबईचा काना कोपरा पिंजून काढला होता. मंगळवारचा शेवटचा दिवस तर या उमेदवारांनी 'मत' कारणीच लावला. या दिवसाचा पुरेपूर वापर करण्यासाठी काही उमेदवारांनी थेट मॉर्निंग वॉकपासूनच सुरुवात केली. काहींनी रेल्वे स्टेशनवर जाऊन, काहींनी थेट हॉटेलमध्ये न्याहरीलाच मतदार राजाला गाठून त्यांचे अमूल्य मत आपल्या पदरात टाकण्याचे आवाहन केले. पदयात्रा, प्रचारफेऱ्या, मतदारांच्या गाठीभेटी आटोपून दमले भागलेले काही उमेदवार संध्याकाळी प्रचार संपल्यानंतर कुटुंबियां सोबत विसावा घेतान दिसले

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages