मुंबई : राज्यातील मागील विधानसभा निवडणुकीत 'पेड न्यूज' प्रकरणावरून बराच गोंधळ उडाला असतानादेखील यंदाच्या लोकसभा निवडणुकीत चार उमेदवारांनी पुन्हा तोच कित्ता गिरवल्याचे समोर आले आहे. काँग्रेसचे मिलिंद देवरा, संजय निरुपम आणि विश्वजीत कदम या तीन आणि अनिल शिरोळे या भाजपा उमेदवाराने लोकसभा निवडणुकीत पैसे देऊन बातम्या छापून आणल्याचा ठपका राज्य निवडणूक आयोगाच्या समितीने ठेवला आहे. त्यावरून पुन्हा राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.
लोकसभा निवडणुकीत 'पेड न्यूज'वर निवडणूक आयोग बारीक लक्ष ठेवून होता. काही ठिकाणी तसा संशय आल्याने त्याची शहानिशा करण्यासाठी त्यांनी एक समिती स्थापन केली होती. या समितीने आपल्या अहवालात देवरा, निरुपम, कदम आणि शिरोळे या चौघांवर ठपका ठेवला आहे. मिलिंद देवरा यांनी एका प्रादेशिक वृत्तपत्रात तीन पेड न्यूज दिल्याचे समितीने नमूद केले. त्याशिवाय, अन्य तीन उमेदवारांनी मराठी वृत्तपत्रात पेड न्यूज दिल्याचे त्याचे म्हणणे आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा, उत्तर मुंबईतील उमेदवार संजय निरुपम, पुणे मतदारसंघातील काँग्रेसचे विश्वजीत कदम आणि भाजपाचे अनिल शिरोळे हे चौघे 'पेड न्यूज'च्या जाळय़ात अडकण्याची शक्यता आहे. अर्थात पेड न्यूजसंदर्भातील आरोप चारही उमेदवारांनी फेटाळून लावले आहेत. आता ते निवडणूक आयोगाकडे दाद मागतात की निवडणुकीत जाहिरातीसाठी केलेल्या खर्चाचा तपशील आयोगाला सादर करून आपले निर्दोषत्व सिद्ध करणार, हे उत्सुकतेचे ठरणार आहे.