राज्यात चार कोटी जनतेने केले मतदान! - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राज्यात चार कोटी जनतेने केले मतदान!

Share This
मुंबई - लोकसभा निवडणुकीत यावेळी मतदानाचा टक्का वाढला असला तरी प्रत्यक्षात मात्र संपूर्ण राज्यातील निम्म्या मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला आहे. राज्यातील ८ कोटी ६ लाख २७ हजार ९३५ मतदारांपैकी फक्त ४ कोटी ८७ लाख १५ हजार ३४७ मतदारांनीच मतदान केल्याचे निवडणूक कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे. 

१६ व्या लोकसभेसाठी महाराष्ट्रात तीन टप्प्यांत निवडणूक पार पडली. शेवटचा आणि अखेरचा टप्पा गुरुवार, २४ एप्रिल रोजी संपल्यानंतर राज्यात ६०.४२ टक्के मतदान झाले. २००९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या लोकसभेतील मतदानाचा टक्का ९.७५ इतका वाढला आहे. 
- राज्यात ८ कोटी ६ लाख २७ हजार ९३५ मतदारांची नोंद आहे. 
- त्यापैकी ४ कोटी ८७ लाख १५ हजार ३४७ मतदारांनी मतदान केले. 
- यामध्ये २ कोटी ६५ लाख ९७ हजार १०६ पुरुष मतदार आहेत. (६२.४० टक्के) 
- २ कोटी २१ लाख १७ हजार ९९४ महिला (५८.१९टक्के) मतदारांनी मतदानात सहभाग घेतला. ह प्रथमच मतदानाचा अधिकार मिळालेल्या २४७ (२२.५२ टक्के) तृतीयपंथीयांनी मतदान केले. कल्याणमध्ये सर्वाधिक ५९ तृतीयपंथीयांनी मतदान केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages