मुंबई : येथील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विविध महागड्या वस्तूंच्या तस्करीवर नियंत्रण ठेवणार्या सीमाशुल्क विभागाच्या(कस्टम) खात्यात पहिल्यांदाच १ हजार कोटींहून अधिक महसूल जमा झाला आहे. २0१३-१४ या आर्थिक वर्षात सीमाशुल्क विभागाने ११८३.५८ कोटींचा महसूल जमवल्याची माहिती उजेडात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत एकूण महसुलात ६३ टक्क्यांची वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे.२0१३-१४ या आर्थिक वर्षात सीमाशुल्क विभागासमोर ८३९ कोटींच्या महसुलाचे उद्दिष्ट होते; पण मागील काही महिन्यांत सोने-चांदीच्या दागिन्यांची तस्करी वाढल्याने सीमाशुल्क विभागाच्या पथकाने हे उद्दिष्ट केव्हाच पार केले आणि आर्थिक वर्षाखेरीस महसुलाचा नवा विक्रम प्रस्थापित केला. मागील आर्थिक वर्षात ७२७ कोटींचा महसूल जमा झाला होता. त्या तुलनेत यंदाच्या महसुलात ६३ टक्क्यांची वाढ झाली आहे. सीमाशुल्क विभागाच्या इतिहासात प्रथमच एवढय़ा प्रमाणावर महसूल जमा झाल्याची माहिती छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमाशुल्क विभागाचे आयुक्त ए. पी. एस. पुरी यांनी दिली. सोने-चांदी तस्करीच्या वाढत्या प्रमाणामुळे महसूल वाढल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
Home
Unlabelled
कस्टमच्या खात्यात जमला ११८३.५८ कोटींचा महसूल
कस्टमच्या खात्यात जमला ११८३.५८ कोटींचा महसूल
Share This
Share This
About Anonymous
Author Details
JPN News is a trusted Marathi digital news portal operating since 2013. JPN News is registered as a news agency with the Government of India. This portal mainly focuses on important social, political, economic, cultural developments in Mumbai, suburbs and Maharashtra. Its main objective is to deliver fast, honest and local to state-level news to the people. Reliability, speed and local vibe are the hallmarks of JPN News.

