मायदेशी पैसे पाठविण्यात भारत पहिल्या स्थानावर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मायदेशी पैसे पाठविण्यात भारत पहिल्या स्थानावर

Share This
वॉशिंग्टन : रोजीरोटीनिमित्त परेदशात काबाडकष्ट करायला गेलेल्या भारतीयांनी २0१३-१४ या आर्थिक वर्षात तब्बल सव्वाचार लाख कोटी रुपये मायेदशी पाठवले आहेत. जगात कोणत्याही देशाच्या विदेशस्थ नागरिकांनी पाठविलेल्या पैशांपेक्षा हे प्रमाण जास्त असल्यामुळे भारत याबाबत जगात पहिल्या स्थानावर आहे. 

जागतिक बँकेने प्रसिद्ध केलेल्या मायग्रेशन अँड डेव्हलपमेंट ब्रीफच्या नव्या अंकात ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात विकसनशील देशांमधील स्थलांतरित लोक आपापल्या देशात एकूण ४३६ अब्ज डॉलर पाठवतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याच अंकातील माहितीनुसार मागील वर्षी जगभरातील विदेशस्थ नागरिकांनी एकूण ५४२ अब्ज डॉलर आपापल्या मायदेशी पाठवले आहेत. हे प्रमाण २0१५ साली ५८१ अब्ज डॉलर, तर २0१६ साली ६८१ अब्ज डॉलर असेल, असा अंदाजदेखील व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत चीन भारतापाठोपाठ दुसर्‍या स्थानावर असून या देशातील विदेशस्थ नागरिकांनी मागील आर्थिक वर्षात सुमारे पावणेचार लाख कोटी रुपये मायदेशी पाठवले आहेत. फिलिपीन्स देशालादेखील या मार्गाने दीड लाख कोटी रुपये प्राप्त झाले आहेत

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages