राहुल गांधींकडून आंबेडकरांचा अपमान - मोदी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राहुल गांधींकडून आंबेडकरांचा अपमान - मोदी

Share This
देशातील नागरिकांना सगळे अधिकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले आहेत. मात्र, आम्ही हा कायदा केला, तो कायदा केला, असे सांगत कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आंबेडकरांचा अपमान करत असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अहमदाबादमध्ये केली.

बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोदींनी त्यांच्या छायाचित्रास पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यानंतर पत्रकारांशी बोलताना मोदी यांनी कॉंग्रेसवर प्रखर शब्दांत हल्ला केला. ते म्हणाले, बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील दलितांना, पीडितांना, शोषितांना न्याय मिळवून दिला. त्यांनी देशवासियांसाठी अनमोल संविधान बनविले. मात्र, देशाचे दुर्भाग्य की शहजादे आंबेडकरांचा अपमान करण्यातच आनंद मानतात. कॉंग्रेसने हा कायदा केला, तो कायदा केला, असे सांगत ते फिरतात. पण देशातील नागरिकांना सगळे अधिकार आंबेडकरांनी दिले आहेत. त्यांनी बनविलेल्या राज्यघटनेतूनच नागरिकांना वेगवेगळे अधिकार मिळाले आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages