'हेल्पलेस' हेल्पलाईन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

'हेल्पलेस' हेल्पलाईन

Share This
मुंबई - मतदार याद्यांतील घोळ, निवडणुकीनिमित्त होणारे पैशांचे वाटप आदी तक्रारी मतदारांना करणे शक्‍य व्हावे, यासाठी निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या हेल्पलाईनच "हेल्पलेस' झाल्या आहेत. या हेल्पलाईनवरून माहिती मिळवण्याऐवजी मनःस्ताप सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी अनेक मतदारांनी केल्या. निवडणूक आयोगाने मतदार यादीतील मतदारांच्या नावांची खात्री करण्यासाठी 1800221950 आणि 1950 या दोन हेल्पलाईन सुरू केल्या होत्या; परंतु त्यावर "आपला कॉल आमच्यासाठी महत्त्वाचा आहे,' हा संदेश मतदारांना ऐकायला मिळत होता, तर पैशांच्या देवाणघेवाणीबाबत तक्रार नोंदवण्यासाठी सुरू केलेल्या 1800221952 या हेल्पलाईनची फक्त रिंगच वाजत होती. त्यामुळे मतदारांची घोर निराशा झाली. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages