इलेक्‍शनसाठी ४४६ बस ९०० टॅक्‍सींचा वापर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

इलेक्‍शनसाठी ४४६ बस ९०० टॅक्‍सींचा वापर

Share This
मुंबई - बेस्टच्या ४४६ बस शनिवारपासून (ता. 19) निवडणुकीच्या कामासाठी तैनात ठेवल्या आहेत. काही रिक्षा आणि स्कूलबसचाही मतदाना वेळी वापर करण्यात येणार आहे. परिणामी बेस्टच्या प्रवाशांना काही मार्गांवर रखडावे लागण्याची शक्‍यता आहे. प्रत्येक बेस्टसाठी रोज १२ हजार रुपये भाडे निवडणूक आयोगाला द्यावे लागणार आहे. सरकारी कामासाठी गाड्या वापरण्यात येणार असल्याने त्यासाठी अनामत रक्कम घेतलेली नाही, अशी माहिती बेस्टने दिली. बेस्ट बससह ९00 टॅक्‍सी निवडणूक आयोगाने भाड्याने घेतल्या आहेत. २४ तासांसाठी प्रत्येक टॅक्‍सीचालकाला १८00 रुपये भाडे देण्यात येणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages