जालना : योगगुरू रामदेव बाबा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी हे दलितांच्या घरी जाऊन मधुचंद्र साजरा करत असल्याचे आक्षेपार्ह विधान करून दलित समाजाच्या भावना दुखवल्याची तक्रार येथील भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर निकाळजे यांनी पोलिसांकडे केली आहे. या तक्रारीवरून रामकृष्ण यादव ऊर्फ रामदेव बाबांविरुद्ध जालना तालुका पोलीस ठाण्यात सोमवारी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये (अँट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना दिलेल्या तक्रारीत निकाळजे यांनी म्हटले आहे की, आपण एका वृत्तवाहिनीवर बातम्या पाहत असतांना त्यावर योगगुरू रामेदव बाबांची मुलाखत सुरू होती. या मुलाखतीदरम्यान, या वृत्त वाहिनीच्या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल बोलताना रामदेव बाबा यांनी दलित समाजाविषयी वादग्रस्त विधान केले. काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्यावर आरोप करताना त्यांनी राहुल गांधी हे मधुचंद्र साजरा करण्यासाठी दलितांच्या घरी जावे, असे सांगून त्यांनी समस्त दलित समाजाचा अपमान केला असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निकाळजे यांनी तक्रारीत केली आहे. दरम्यान, या प्रकरणी निकाळजे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोमवार, २८ रोजी योगगुरू रामेदवबाबा (रा. अलीपूर महेंद्रगड हरयाणा, ह. मु. पतंजली योगपीठ, वाराणसी) यांच्याविरुद्ध जालना तालुका पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अन्याय, अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३ (१) १0 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.