मुंबई : बेस्ट उपक्रम हा मुंबईतील प्रवाशांच्या सोयीसाठी आहे, कर्मचार्यांच्या सोयीसाठी नाही, असे सांगत बेस्ट उपक्रमामध्ये येऊ घातलेले नवे ड्युटी वेळापत्रक हे वाहक-चालकांच्या सोयीसाठीच असल्याचा दावा बेस्टचे महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी मंगळवारी झालेल्या बेस्ट समितीच्या सभेमध्ये केला. या नव्या वेळापत्रकामुळे वाहक आणि चालकांच्या सध्याच्या ड्युटीमधील तास कमी होणार असल्याचेही गुप्ता यांनी सांगितले.
बेस्टमध्ये राबवण्यात येणार्या कॅनेडियन ड्युटी वेळापत्रकाविरु द्ध वाहक आणि चालकांनी १ आणि २ एप्रिल रोजी सामूहिक रजा आंदोलन केले होते. त्यामुळे मुंबईतील बेस्टची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती. या दोन दिवसांत बेस्टचे सुमारे ६ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. मंगळवारी झालेल्या बेस्ट समितीच्या सभेमध्ये या विषयावर चर्चा करीत असताना बेस्ट समिती सदस्यांनी बेस्टमधील कर्मचार्यांच्या हिताचा विचार करून नवीन वेळापत्रकात बदल करून ते राबवण्यात यावे, अशी मागणी केली. त्या वेळी उत्तर देताना बेस्टचे महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी सांगितले की, कंपनी जरी कॅनेडियन असली तरी वाहक-चालकांचे शेड्युल्ड मात्र बेस्ट उपक्रमाचेच आहे. बेस्ट उपक्रम हा प्रवाशांसाठी आहे, कर्मचार्यांच्या सोयीसाठी नाही. उच्च न्यायालयाने आदेश देऊनही बेस्टमधील मान्यता प्राप्त संघटना संपात सहभागी होतात, त्यामुळे बेस्टचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. या नव्या वेळापत्रकानुसार बेस्टमधील वाहक-चालकांच्या सध्याच्या ड्युटीच्या तासांमध्ये घट होणार असल्याचेही गुप्ता यांनी निदर्शनास आणले.
जूनमध्ये पुन्हा संप होऊ शकतो
१ जूनपासून बेस्टमध्ये नवे वेळापत्रक राबवण्यात येणार आहे. त्यामुळे जून महिन्यात पुन्हा संप केला जाऊ शकतो, अशी शक्यता बेस्ट समितीचे मनसेचे सदस्य केदार होंबाळकर यांनी व्यक्त केली आहे. तसेच बेस्टचे जे दोन दिवसांचे आर्थिक नुकसान झाले आहे, ते मान्यता प्राप्त संघटनांकडून वसूल करण्यात यावे, अशी मागणीही केदार होंबाळकर यांनी केली आहे.