नाल्यांची सफाई सरासरी ८ टक्केच - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नाल्यांची सफाई सरासरी ८ टक्केच

Share This
मुंबई : पावसाळ्याचे वेध लागताच मुंबई महापालिकेने शहर आणि पूर्व-पश्‍चिम उपनगरांतील नाल्यांच्या सफाईचे काम हाती घेतले असून १0 एप्रिलपर्यंत ८.0६ टक्के सफाई झाल्याची माहिती पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी दिली. नऊ टक्के सफाई करण्याचे उद्दिष्ट होते; पण ते साध्य झाले नाही. पावसाळ्यापूर्वी शहरातील आणि उपनगरातील ३ लाख २0 हजार २५३ मीटर लांबीच्या नाल्यांमधून ३ लाख ६५ हजार १५३ घनमीटर कचरा, गाळ बाहेर काढण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे; पण १0 एप्रिलपर्यंत ९ टक्क्यांपैकी ८.0६ टक्के गाळ, कचरा काढल्याचे या विभागाचे मुख्य अभियंता लक्ष्मण व्हटकर यांनी सांगितले. पावसाळ्यापूर्वी एकूण ७0 टक्केच कचरा व गाळ काढण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती त्यांनी दिली. २00५ मध्ये मुंबईत झालेल्या महाप्रलयास जबाबदार असणार्‍या मिठी नदीच्या सफाईचे कामही हाती घेण्यात आले आहे. शहर आणि पश्‍चिम व पूर्व उपनगरांत एकूण २२ हजार ६२५ मीटर नदीचे पात्र साफ करण्याचे उद्दिष्ट असले तरीही ९ टक्क्यांपैकी ७.८८ टक्के मिठी पात्राची सफाई झाली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages