मुंबई : मुंबई महापालिकेच्या १७ प्रभाग समित्यांपैकी पाच समित्यांवर शिवसेना, भाजपा आणि रिपब्लिकन पक्षाच्या महायुतीने वर्चस्व प्रस्थापित केले असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला मात्र फक्त तीन समित्यांवर समाधान मानावे लागले.
सी, डी आणि पी-दक्षिण या समित्यांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. सी आणि डी प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना-रिपाइं युतीच्या उमेदवार ज्योत्स्ना मेहता यांची बिनविरोध निवड झाली. येथे ११ सदस्यांनी सहभाग घेतला आणि पी-दक्षिण समितीसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीचे जितेंद्र वळवी यांचाच अर्ज आल्यामुळे ते बिनविरोध निवडून आले.
ए, बी आणि ई प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे मनोज जामसुतकर ९ मते मिळवून विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार गणेश सानप यांना फक्त तीन मते मिळाली. या निवडणुकीत १५ पैकी १२ सदस्यांनी भाग घेतला. या वेळी तीन सदस्य अनुपस्थित होते. मनसेने काँग्रेसला पाठिंबा दिला. एफ दक्षिण आणि एफ उत्तर या समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार प्रणिता वाघधरे १२ मते मिळवून निवडून आल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेसच्या पल्लवी मुणगेकर यांना चार मते मिळाली. या निवडणुकीत १६ सदस्यांनी भाग घेतला तर एक सदस्य मनोज संसारे अनुपस्थित होते.
पी-उत्तर समितीत एकूण १६ मतांपैकी महायुती पुरस्कृत अपक्ष नगरसेविका सिरिल डिसोझा ११ मते मिळवून निवडून आल्या तर काँग्रेसच्या परमिंदर भामरा यांना पाच मतांवर समाधान मानावे लागले. आर दक्षिण प्रभाग समितीच्या निवडणुकीत काँग्रेसचे राम अशिष गुप्ता यांना सहा मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपाच्या सुनीता यादव यांना पाच मते मिळाली. अवघ्या एका मताने त्यांचा पराभव झाला. जी-दक्षिण प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी एकू ण नऊ सदस्यांनी सहभाग घेतला. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रत्ना महाले पाच मते निवडून आल्या, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेना-भाजपाच्या किशोरी पेडणेकर यांना चार मते मिळाली. आर उत्तर आणि मध्य प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत १७ नगरसेवकांपैकी भाजपाचे प्रवीण शाह यांना १0 मते मिळाली. त्यांच्या विरोधक काँग्रेसच्या शीतल म्हात्रे यांना फक्त चार मते मिळाली.