विषारी वायूमुळे गुदमरून कामगाराचा मृत्यू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

विषारी वायूमुळे गुदमरून कामगाराचा मृत्यू

Share This
मुंबई : नालेसफाई करणार्‍या कामगाराचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाल्याची घटना वांद्रे येथील बीकेसीमध्ये बुधवारी सायंकाळी पाच वाजता घडली. बीकेसीमधील एशियन हार्ट इन्स्टिट्युटसमोरील नाल्याची पावसाळ्यापूर्वी सफाई सुरू असताना त्यात लालू (३५) हा कामगार नाल्यात उतरला होता. त्या वेळी निघालेल्या विषारी वायूमुळे लालूचा जीव गुदमरला आणि त्याला श्‍वास घेणे जड जाऊ लागले; पण त्याला त्वरित बाहेर न काढल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. ही बातमी त्याच्या सहकार्‍यांना समजताच त्यांनाही धक्का बसला. पण अग्निशमन दलाने त्याला बाहेर काढून भाभा रुग्णालयात पाठवले असता तो गतप्राण झाल्याचे आढळले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages