छोटा राजनवर मलेशियात उपचार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

छोटा राजनवर मलेशियात उपचार

Share This

मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्याच्यावर मलेशिया येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही मूत्रपिंड खराब झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते; मात्र दाऊद इब्राहिमला संपविल्याशिवाय आपण संपणार नाही, असा निरोप राजनने त्याच्या निकटवर्तीयांमार्फत दिल्याचे बोलले जाते. 
बॅंकॉकमध्ये दाऊद टोळीकडून 2001 मध्ये झालेल्या हल्ल्यात शरीरात राहिलेल्या गोळीमुळे राजन मूत्रपिंडाच्या विकाराने ग्रस्त आहे. हा विकार बळावल्यामुळे गेल्या आठवड्यात त्याला मलेशिया येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याच्या रक्तदाबातदेखील वाढ झाल्याचे सांगण्यात येते. राजनच्या प्रकृतीअस्वास्थ्याच्या वृत्तानंतर त्याचे वास्तव्य राहिलेल्या चेंबूरच्या टिळकनगर परिसरातील त्याच्या समर्थकांत खळबळ उडाली आहे. या घटनेची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी त्याच्या निकटवर्तीयांशी संपर्क साधल्याचेही सूत्र सांगतात; मात्र चौकशीअंती राजनची प्रकृती स्थिर असल्याचेही सांगण्यात येते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages