जकात नाक्यांवर नवीन संगणक, प्रिंटर आणण्याचा प्रस्ताव - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

जकात नाक्यांवर नवीन संगणक, प्रिंटर आणण्याचा प्रस्ताव

Share This
मुंबई : मुंबई महापालिकेच्या पाच जकात नाक्यांवरील जकात वसुली वाढत असताना तेथील संगणक, प्रिंटरना 'घरघर' लागली असून ते केव्हाही 'मान' टाकतील, अशी अवस्था असल्यामुळे नवीन संगणक, प्रिंटर आणण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने तयार केला आहे. या विभागासाठी १२0 नवीन संगणक आणि १0 नवे प्रिंटर खरेदी करण्यात येणार आहेत. या नाक्यांवरील ही महत्त्वाची यंत्रणा वारंवार बिघडत असल्याने कर्मचारीही मेटाकुटीला आले आहेत. यासाठी ६६ लाखांहून अधिक रुपये खर्च येणार आहे. 

पालिकेचे मानखुर्द, दहिसर, ऐरोली, आनंद नगर (मुलुंड पूर्व) आणि लालबहादूर शास्त्री मार्ग (मुलुंड पश्‍चिम) येथे जकात नाके आहेत. तेथे दररोज लाखो रुपयांची जकात वसुली होते; पण येथील संगणक आणि पावती छापणारे प्रिंटर खराब झाले आहेत. या जकात नाक्यांवर आर आणि एन फॉर्म, नियमित भरले जात असून आस्थापना आणि सांख्यिकी या विभागांची विविध कामेही संगणकांवर चालतात; पण त्यांची आयुर्मयादा संपूनही ते चालवण्यात येत असल्याने वारंवार बंद पडत आहेत. परिणामी, तेथील अधिकारी व कर्मचारी कमालीचे वैतागले असून नवे संगणक आणि प्रिटंर खरेदी करण्याची मागणी त्यांच्याकडून सतत होत होती. अखेर प्रशासनाने ६६ लाख ५७ हजार रुपये खचरून १२0 संगणक व १00 प्रिंटर आणण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समितीसमोर लवकरच मंजुरीसाठी येईल.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages