मुंबई : मुंबई शहरातील ६ लोकसभा मतदारसंघांत गुरुवार, २४ एप्रिल रोजी होणार्या मतदानाच्या दिवशी पोलिसांनी व्यापक बंदोबस्त ठेवला आहे. हे मतदान शांततेत व सुरळीतपणे पार पडण्यासाठी शहरभर पोलिसांनी मोठय़ा बंदोबस्ताची आखणी केली आहे. या ६ मतदारसंघातील एकूण २९१ अतिसंवेदनाक्षम ठिकाणी निमलष्करी दलाच्या जवानांचे ध्वजसंचलन सुरू असून त्यामुळे मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण करणार्या समाजकंटकांवर अंकुश निर्माण होईल. समाजकंटक व विविध गुन्ह्यांत जामिनावर बाहेर आलेल्या गुंडांची धरपकड करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले असून आतापर्यंत १४ हजारांहून अधिक समाजकंटकांची धरपकड करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी पत्रकारांना दिली. मंगळवारी प्रचाराची सांगता झाल्यामुळे शहरात येणार्या व शहरातून बाहेर जाणार्या वाहनांची पोलीस कसून तपासणी करत असून संशयित ठिकाणी अचानक नाकाबंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांत गुन्हेगार टोळय़ांच्या हस्तकांकडून हत्याराचा साठा हस्तगत करण्यात आल्यामुळे साधव झालेल्या पोलिसांनी मतदानाच्या दिवशी अधिक सावधानता बाळगली आहे. मतदानाच्या दिवशी अफवा पसरवणार्या व दहशत निर्माण करणार्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश अधिकार्यांना देण्यात आले असल्याचे आयुक्त म्हणाले. बोगस मतदान करणार्यांविरुद्ध तसेच मतदारांना वाहनातून मतदान करण्यासाठी आणणार्या लोकांविरुद्ध कडक कारवाई केली जाणार आहे. सर्वच्या सर्व ९ हजार ८७९ मतदान केंद्रांबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, त्याद्वारे संशयितांवर पोलीस कडक नजर राहणार आहे.

मतदानाच्या दिवशी बंदोबस्तासाठी ७ उपायुक्तांची, २१ सहाय्यक आयुक्त, ४४२ निरीक्षक, ८२३ सहाय्यक निरीक्षक, ८ हजार १६९ उपनिरीक्षक तसेच १ हजार ९३४ पोलीस शिपायांची नेमणूक करण्यात आली आहे. पोलिसांच्या मदतीला २५ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा व राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या आणण्यात आल्या आहेत. मतदान केंद्रावर काम करण्यासाठी एकूण १४ हजार ४९९ कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे मारिया यांनी सांगितले. मतदान केंद्राच्या बाहेर बॉम्बशोधक पथके तसेच शीघ्रकृती दलाचे जवान सज्ज ठेवले जाणार आहेत. मतदान केंद्राच्या बाहेर अथवा कुठेही संशयित वस्तू आढळल्यास त्याची माहती तात्काळ पोलिसांना १0१ अथवा 0२२२२६३३३३३ या क्रमांकावर कळवावी, अशी विनंती आयुक्तांनी केली आहे. मतदान केंद्राच्या बाहेर सशस्त्र पोलिसांची तसेच संदेशावहन गाड्यांची फिरती गस्त ठेवण्यात आली असल्याचे सांगून मारिया म्हणाले की, मतदान शांततेने व मोकळय़ा वातावरणात पार पाडण्यासाठी शहरभर व्यापक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बंदोबस्ताच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी ४ सहआयुक्त, ६ अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक करण्यात आली असून, आपण स्वत: शहरात फिरून परिस्थितीची पाहणी करणार असल्याचे मारिया यांनी सांगितले.