आचारसंहिता भंगाचे ५२३ गुन्हे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आचारसंहिता भंगाचे ५२३ गुन्हे

Share This
मुंबई - लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू झाल्यापासून राज्यभरात आचारसंहिता भंग झाल्याप्रकरणी आत्तापर्यंत तब्बल ५२३ गुन्हे दाखल झाले असून, ३४ कोटींची बेहिशेबी रक्‍कम जप्त करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोग कार्यालयातून देण्यात आली. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची शेवटची प्रचारसभा परवा सोमवारी बांद्रा-कुर्ला संकुल येथे पार पडली असता या सभेत आक्षेपार्ह वक्‍तव्य केल्याने शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर गुन्हा दाखल झाला. याबरोबरच निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून आजपर्यंत ५२३ गुन्ह्यांची नोंद झाली असून, यामध्ये सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांच्या विरोधात ठिकठिकाणी गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages