कल्पना गिरी खून प्रकरणातील आरोपींना फाशी द्या - आठवले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कल्पना गिरी खून प्रकरणातील आरोपींना फाशी द्या - आठवले

Share This
मुंबई : कल्पना गिरी या तरुणीवरील अत्याचार आणि खून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा. या खुनामागे मोठे षड्यंत्र आणि रॅकेट कार्यरत आहे. या प्रकरणातील आरोपी कोणत्याही पक्षाचे असो, त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. लातूर येथील गोसावी समाजातील राजकी कायकर्त्या कल्पना गिरी यांच्यावर झालेला अत्याचार आणि खून महाराष्ट्राच्या लौकिकला काळिमा फासणारी घटना आहे. या खुनाचा रिपाइंने तीव्र निषेध केला आहे. गिरी कुटुंबीयांना शासनाने १0 लाख रुपये सांत्वनपर द्यावेत. तसेच या प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी करावी, अशी मागणी आठवले यांनी केली. आठवले यांनी नुकतेच गिरी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages