पालिकेच्या शाळा उन्हाळी सुट्टीनंतर कधी सुरू होणार? - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेच्या शाळा उन्हाळी सुट्टीनंतर कधी सुरू होणार?

Share This
मुंबई : राज्य शासनाने पुढील शैक्षणिक वर्षातील (सन २0१४-१५) उन्हाळी व हिवाळी सुट्टीबाबत अधिकृतपणे घोषणा केली असली तरी मुंबई महापालिकेच्या प्राथमिक शाळा उन्हाळी सुट्टीनंतर नेमक्या कोणत्या दिवशी सुरू होणार याबाबत अजूनपर्यंत पालिका शिक्षण विभागाने कोणताच निर्णय न घेतल्याने पालिकेच्या शाळाप्रमुखांसमोर मोठाच पेच निर्माण झाला आहे. पालिका शाळांना उन्हाळी सुट्टी कधी सुरू होणार आणि त्यानंतर जूनमध्ये शाळा क धी सुरू होणार, या पालकांच्या प्रश्नाने शिक्षक आणि मुख्याध्यापक हैराण झाले आहेत.

राज्यभरातील सर्व माध्यमिक शाळा १६ जून रोजी एकाच दिवशी सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसे परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. मात्र त्यात प्राथमिक शाळांचा उल्लेख केलेला नाही. मुंबई महानगरपालिका ही स्वायत्त संस्था आहे. महापालिकेच्या सार्वभाषिक शाळांना उन्हाळी व हिवाळी सुट्टीसह वर्षभरात सार्वजनिक सुट्टय़ांसह कोणकोणत्या सुट्टय़ा द्यायच्या याबाबत दरवर्षी डिसेंबर महिन्यात सर्व संघटनांसोबत बसून शिक्षणाधिकारी निर्णय घेतात; परंतु यावर्षी शिक्षण विभागाची निष्क्रियता आडवी आल्याने एप्रिल महिना संपत आला तरी पुढील शैक्षणिक वर्षातील सुट्टय़ांबाबत कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये कमालीची संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. पालिका प्राथमिक शाळांना येत्या २ मेपासून उन्हाळी सुट्टी होणार असे सांगितले जात असले तरी उन्हाळी सुट्टीनंतर जूनमध्ये शाळा नेमक्या कोणत्या तारखेपासून सुरू होणार याबाबत मात्र शिक्षणाधिकार्‍यांनी अजून कोणताच निर्णय न घेतल्याने शाळांसह पालकांसमोरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages