मुंबई - भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांना जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण करणारे मनसे आमदार राम कदम यांच्यासह सुमारे ३० ते ३५ मनसे कार्यकर्त्यांवर पार्कसाइट पोलीस ठाण्यात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सहाजणांना अटक केली आहे.
भगवान गौतम बुद्धांच्या अस्थी श्रीलंकेहून आणण्यात आल्या असून हा अस्थिकलश दर्शनासाठी आमदार राम कदम यांच्या घरी ठेवला आहे असे फलक विक्रोळी, घाटकोपर परिसरात लावले आहेत. अस्थी कुणाच्याही घरी ठेवता येत नाहीत. त्या विहारात ठेवा अशी मागणी करीत भारिप बहुजन संघाचे कार्यकर्ते रोहित तांबे, रितेश लांडगे, रवींद्र मोरे हे तक्रार करण्यासाठी पार्कसाइट पोलीस ठाण्यात पोहचल्याची कुणकुण लागताच मनसेचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात गेले आणि भारिपच्या कार्यकर्त्यांना घरी घेऊन आले. राम कदम यांच्या घरी मनसे कार्यकर्ते आणि भारिपच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. मनसे कार्यकर्त्यांनी जातिवाचक शिवीगाळ करीत तिघांना जबर मारहाण केली. या तिघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.