खैरलांजीसारखे प्रकार खपवून घेणार नाही - ऍड. प्रकाश आंबेडकर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

खैरलांजीसारखे प्रकार खपवून घेणार नाही - ऍड. प्रकाश आंबेडकर

Share This
मुंबई - मुंबईसारख्या शहरात खैरलांजीसारखे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असे ठणकावून सांगत राम कदम यांच्याविरोधात कडक कारवाई झाली नाही, तर मुंबई शहरात तीव्र आंदोलन करू, असा इशारा भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. घाटकोपरमध्ये तथागत बुद्धांचा अस्थिकलश आणल्याचा दावा करणाऱ्या मनसेच्या आमदार राम कदम यांच्याकडे विचारपूस करणाऱ्या तरुणांना मारहाण केल्याचा प्रकार रविवारी घडला होता. त्याविरोधात आंबेडकरी अनुयायांत संतापाचे वातावरण आहे. विक्रोळी पार्कसाइट पोलिस ठाण्यात कदम यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या घटनेबाबत गृहमंत्री आर. आर. पाटील, पोलिस आयुक्त राकेश मारिया यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी कारवाईचे आश्‍वासन दिले आहे; मात्र कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा आंबेडकर यांनी दिला. बुद्धाच्या अस्थींचे प्रदर्शन करून मते मागण्याचा प्रयत्न म्हणजे निवडणूक आचारसंहितेचा भंग आहे. मनसे उमेदवार राम कदम यांनी समर्थन दिलेल्या भाजपच्या किरीट सोमय्या यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी भारिप-बहुजन महासंघाचे प्रवक्ते ज. वि. पवार यांनी केली.

रिपब्लिकन पक्षाच्या वतीने राम कदम यांना अटक करण्याच्या मागणीसाठी सोमवारी विक्रोळी पार्कसाईटपासून "आर मॉल'पर्यंत मोर्चा काढण्यात आला. असे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिला. रविवारी रात्री आठवले व प्रकाश आंबेडकर यांनी विक्रोळीतील महात्मा फुले रुग्णालयात जाऊन हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणांची भेट घेतली.

रामदास आठवलेंकडून निषेध 
गौतम बुद्धांचा अस्थिकलश खरा की खोटा, याची माहिती विचारणाऱ्या बौद्ध तरुणांना मारहाण केल्याच्या घटनेचा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी निषेध केला. या प्रकरणातील सूत्रधार कोणीही असला तरी त्याच्यावर कठोर कारवाई करावी व या प्रकरणातील अस्थिकलश खरा आहे की खोटा, याचाही तपास व्हावा, अशी मागणी आठवले यांनी केली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages