फुकट वीज देणारे मोदी कोण?: पाटकर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

फुकट वीज देणारे मोदी कोण?: पाटकर

Share This

Medha-Patkar
सरदार सरोवर प्रकल्प पूर्ण झाला असता तर महाराष्ट्राला ४०० कोटी रुपयांची वीज फुकट मिळाली असती, असं वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी काल, सोमवारी मुंबईत एका सभेत केलं होतं. 'आप'च्या उमेदवार, नर्मदा बचाव आंदोलनच्या नेत्या मेधा पाटकर यांनी मोदींच्या या वक्तव्यावर जोरदार आक्षेप घेतला आहे.

मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत मेधा पाटकर म्हणाल्या, 'सरदार सरोवर प्रकल्पासाठी महाराष्ट्राने ३३ आदिवासी गावे, ९ हजार ५०० हेक्टर जमीन, त्यावरील संपन्न जंगल यासोबतच हजारो कोटी रुपयांचा महसूल गमावलेला आहे. त्याशिवाय सरदार सरोवराच्या विजेपैकी २७ टक्के वीज मिळवण्यासाठी तीन हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. सरदार सरोवर प्रकल्प हा आंतरराज्यीय प्रकल्प आहे. संबंधित राज्ये त्यातला आपापला वाटा उचलत आहेत. तर मग मोदी महाराष्ट्राला फुकट वीज देण्याचा दावा कसा काय करू शकतात?', असा सवाल मेधा पाटकर यांनी केला आहे. मोदी हे धादांत खोटे बोलत असून निवडणूक प्रचारात असे वारंवार खोटेच सांगून ते मतदारांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप पाटकर यांनी केला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages