मुंबई : राज्य सरकारने रेल्वे स्टेशनवर १0८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका पुरविण्याचा निर्णय घेतला होता. त्यापैकी मध्य रेल्वेच्या वाट्याला फक्त ११ रुग्णवाहिका आल्या आहेत. ११ पैकी आतापर्यंत ६ रुग्णवाहिका मध्य रेल्वे मार्गावर दाखल झाल्या आहेत. त्यामुळे उर्वरित रुग्णवाहिका कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
रेल्वे स्थानकांवर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे अपघातात जखमी होणार्या प्रवाशांना वैद्यकीय मदत मिळण्यास वेळ होतो. त्यामुळे स्थानकांवर सुसज्ज अशी रुग्णवाहिका पुरविण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांसह अनेक स्वयंसेवी संस्थांनी लावून धरली होती. त्यानुसार राज्य सरकारने स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने प्रत्येक रेल्वे स्थानकांवर रुग्णवाहिका पुरविण्याचा निर्णय घेतला. पण प्रत्यक्षात मात्र मध्य रेल्वेच्या वाट्याला अवघ्या ११ रुग्णवाहिका आल्या आहेत. त्यापैकी एकही रुग्णावाहिका हार्बर मार्गावर देण्यात आलेली नाही. मध्य रेल्वेला मिळणार्या ११ रुग्णवाहिकांपैकी सीएसटी, भायखळा, परळ, विद्याविहार, मुलुंड, नाहुर या स्थानकांवर रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. तर सॅण्डहस्र्ट रोड, मस्जिद बंदर, माटुंगा, भांडुप, घाटकोपर या स्थानकांवर अजून रुग्णावाहिका दाखल झालेल्या नाहीत. हार्बर मार्गावर एकही रुग्णवाहिका न दिल्याने पुन्हा एकदा हार्बर मार्गाला दुजाभाव केलेला आहे.
मध्य रेल्वे मार्गावर किमान ३0 रुग्णवाहिकांची आवश्यकता आहे. किमान ठाणे, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, कसारा, टिटवाळा, डॉकयार्ड रोड, कॉटनग्रीन, शिवडी, वडाळा, गोवंडी, चेंबूर, मानखुर्द, वाशी, बेलापूर, पनवेल या स्थानकांवर रुग्णवाहिका असणे अत्यंत आवश्यक आहे.