मुंबई : उपनगरीय रेल्वेने प्रवास करणार्या प्रवाशांमध्ये फुकट्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर मार्च महिन्यात हाती घेतलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेत तब्बल १ लाख ८0 हजार फुकट्या प्रवाशांना पकडण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत सुमारे ६ कोटी ९८ लाख रुपयांचा दंड या फुकट्या प्रवाशांकडून वसूल करण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर मार्च महिन्यामध्ये विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये १ लाख ८0 हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. फुकटे प्रवासी, जादा सामान घेऊन जाणार्या प्रवाशाविरोधात ही कारवाई करण्यात आली होती. त्यामधून ६ कोटी ९८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते विरारपर्यंतच्या मार्गावर हाती घेतलेल्या मोहिमेतून मार्च महिन्यात जो ६ कोटी ९८ लाख रुपयांचा दंड वसूल केला, तो गेल्या वर्षीपेक्षा १७.८५ टक्के जादा आहे. या मोहिमेत १ लाख ८0 हजार फुकट्या प्रवाशांना पकडण्यात आले आहे.
मार्चमध्ये घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेतून दादरसह बोरिवली ते विरारदरम्यानच्या गाड्यांमधून प्रवास करणार्या फुकट्या प्रवाशांवर जादा लक्ष केंद्रित करण्यात आले होते. उपनगरीय रेल्वे मार्गावर दिवसेंदिवस फुकट्या प्रवाशांची संख्या वाढतेच आहे. गेल्या आठ महिन्यांमध्ये आठ वेळा फुकट्या प्रवाशांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यामध्ये ३३ हजार प्रकरणे नोंदवण्यात आली होती. त्यामधून ७९ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. त्यामुळे प्रवाशांनी विदाऊट तिकीट प्रवास करू नये, असे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.