वाढत्या गुन्हेगारीला सरकार जबाबदार - डॉ. नीलम गोर्‍हे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

वाढत्या गुन्हेगारीला सरकार जबाबदार - डॉ. नीलम गोर्‍हे

Share This
मुंबई : राज्यात कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सरकारला अपयश आल्याने गुन्हेगारांमध्ये भीती राहिलेली नाही. त्यामुळे राज्यात दिवसेंदिवस गुन्ह्यांत वाढ होत असून याला सरकारच जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गोर्‍हे यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेत केला.
अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा गावात हत्या झालेल्या दलित तरुणाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन आल्यानंतर त्या बोलत होत्या. जातीय तेढ वाढवून मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठीच दलितांच्या मनात महायुतीची भीती दाखवली जात आहे. मात्र समाजाचा एकोपा राखण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उभ्या केलेला शिवशक्ती-भीमशक्तीचा नक्कीच उपयोग होईल, असे त्यांनी सांगितले. दलितांवरील वाढत्या अत्याचाराला गृहविभाग तसेच विधी आणि न्याय विभाग जबाबदार आहे. सुप्रशासनाच्या आणि प्रबोधनाच्या अभावामुळे कायद्याची अंमलबजावणी होत नाही. आदिवासी, दलितांवरील खटले निकाली काढण्यासाठी गृहमंत्री आर. आर. पाटील प्रत्येक घटनेनंतर जलदगती न्यायालय स्थापण्याची घोषणा करतात. पण प्रत्यक्षात काहीही होत नाही, असेही डॉ. गोर्‍हे यांनी नमूद केले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages