मुंबईत सध्या कॅम्पा कोला कंपाऊंडमधील बेकायदा इमारतींचा विषय गाजत असला, तरी महापालिकेच्या नाकावर टिच्चून तब्बल ४३0 बेकायदेशीर इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्याचा 'उच्चांक' कांदिवली, दहिसर, बोरिवलीतील १७१ इमारतींचा आहे, असे समजते. यापैकी काही इमारती पाडण्याचे दावे न्यायालयात प्रलंबित आहेत.
कॅम्पा कोला प्रकरणानंतर पालिका प्रशासनाला अचानक जाग आली असून मुंबईत किती अनधिकृत इमारती आहेत, याचा शोध पालिकेने सुरू केला. त्या वेळी ४३0 बेकायदा इमारती असल्याचे निदर्शनास आले. वरळीत ७८, अंधेरी पश्चिममध्ये ५५, आर-उत्तरमध्ये ३८ आणि आर दक्षिणमध्ये ३७ इमारती बेकायदा असल्याचे आढळून आले आहे. इमारत बांधण्यापूर्वी किती मजले बांधावेत याची परवानगी पालिकेने दिली असतानही त्याचे उल्लंघन करून बोरिवलीत १९, मालाडमध्ये १५, अंधेरीत १0, चंदनवाडीत १0, जे.जे. रुग्णालय परिसर आणि मुलुंडमध्ये प्रत्येकी ९ उत्तुंग इमारती बांधण्यात आल्या आहेत, असे पालिकेतील विश्वसनीय गोटातून कळते. बेकायदा बांधकाम केल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधितांविरोधात महापालिका अधिनियमांतर्गत खटले दाखल करण्यात आले आहेत. वर्सोव्यात ३0 खटले, खारमध्ये १९, जुहूला ८ व सांताक्रुझ आणि एमआयडीसी येथे प्रत्येकी ४ खटले दाखल केले आहेत, असे समजते.