मुंबईचा पाणीपुरवठा तीन दिवस बंद राहणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईचा पाणीपुरवठा तीन दिवस बंद राहणार

Share This
मुंबई - डॉकयार्ड येथे महापालिकेची बाबू गेनू मंडईची इमारत कोसळून 60 जणांचे बळी गेले होते. या प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या अभियंत्यांना कामावर घेण्यासाठी महापालिकेचे अभियंते तीन दिवस ठिय्या आंदोलन करणार आहेत. त्यामुळे 27 ते 29 मेपर्यंत मुंबईचा पाणीपुरवठा बंद होण्याची शक्‍यता आहे.
डॉकयार्ड इमारत प्रकरणात सहा अभियंत्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना पुन्हा कामावर घेऊन त्यांच्यावरील फौजदारी गुन्हे रद्द करावेत, या मागणीसाठी महापालिकेच्या कृती समितीने जानेवारीत ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता; मात्र प्रशासनाने या आंदोलनाला न्यायालयातून स्थगिती घेतली. त्यानंतर प्रशासनाने अभियंत्यांच्या मागण्यांबाबत कोणताच निर्णय घेतला नाही. यामुळे पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सचिव साईनाथ राजाध्यक्ष यांनी सांगितले. या आंदोलनात चार हजार अभियंते सहभागी होणार आहेत. महापालिकेच्या विविध सेवांवर याचा परिणाम होण्याची शक्‍यता आहे. 

महापौर सुनील प्रभू आणि आयुक्त सीताराम कुंटे यांना याविषयीचे निवेदन देण्यात आले आहे. डॉकयार्ड दुर्घटनेतील अभियंत्यांना अभय देण्याबरोबरच अभियंत्यांना सहावा वेतन आयोग लागू करावा; तसेच सहायक अभियंत्यापासून संचालक पदांपर्यंतची भरती विभागांतर्गतच करावी, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages