डंपिंग ग्राऊंडवर ट्रक अडकण्याची भीती - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

डंपिंग ग्राऊंडवर ट्रक अडकण्याची भीती

Share This
मुंबई - कचरा वाहून नेणारे ट्रक पावसाळ्यात डंपिंग ग्राऊंडवर अडकण्याची भीती यंदाही असल्याने कचरा रस्त्यावर राहण्याची भीती आहे. त्यामुळे शहरातील कचरा उचलला न गेल्यास नालेही तुंबण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 
पालिकेच्या गोराई डंपिंग ग्राऊंडवर चांगले रस्ते नसल्याने कचऱ्याचे ट्रक जाण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे शहरातील कचरा उचलला जात नव्हता. गेल्या वर्षी याचा भयंकर फटका मुंबईला बसला. त्यामुळे यंदा पालिकेने पावसाळ्यापूर्वी ट्रक कचऱ्याच्या डोंगरावर चढवण्यासाठी रस्ते बनवून घेतले; मात्र हे रस्ते कचऱ्यातच बनविण्यात आलेले असल्याने पावसाळ्यात ते टिकाव धरू शकणार नाहीत. परिणामी यंदाही पावसाळ्यात डंपिंग ग्राऊंडवर कचऱ्याचे ट्रक अडकण्याची भीती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली. 

स्थायी समिती अध्यक्ष शैलेश फणसे यांनी अलीकडेच पालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन डंपिंग ग्राऊंडच्या परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्या वेळी यंदा पावसाळ्यात कचऱ्याची समस्या राहणार नाही, असे आश्‍वासन दिले होते; मात्र हे रस्ते कचऱ्याच्या ढिगावरच बनविण्यात आल्याने त्यांचा पावसाळ्यात निभाव लागण्याबाबत अधिकारीच साशंक आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages