नाल्यांतील गाळ विल्हेवाटीसाठी पालिका ५0 कोटीं खर्च करणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नाल्यांतील गाळ विल्हेवाटीसाठी पालिका ५0 कोटीं खर्च करणार

Share This
मुंबई/जेपीएन न्यूज: रस्त्यावर अनधिकृतपणे टाकण्यात येणारा कचरा आणि डेब्रिज उचलून त्याची आणि नाल्यांची सफाई झाल्यानंतर त्यातील गाळाची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेच्या तिजोरीवर दोन वर्षांच्या कालावधीसाठी ५0 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. पालिकेने या वर्षापासून 'डेब्रिज ऑन कॉल' ही पद्धत सुरूकेली असली तरी त्याचा बोजा मात्र पालिकेला सोसावा लागणार आहे. डेब्रिज उचलून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी दोन वर्षांसाठी १६ कोटी २0 लाख रुपये आणि गाळाची मुंबईबाहेर विल्हेवाट लावण्यासाठी ३३ कोटी ९७ लाख रुपये खर्च होणार आहेत. 


या दोन्ही कामांसाठी एकूण ५0 कोटी १८ लाख ९८ हजार ५७४ रुपये खर्च होणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समितीसमोर शुक्रवारी मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे. २४ विभागातील परिमंडळ एक, दोन, गट क्र. १, २ आणि ३, परिमंडळ ६ आणि ७ येथे दररोज तब्बल ९३५ मेट्रिक टन डेब्रिज निर्माण होते आणि विकासकही विविध रस्ते व चौकांमध्ये बांधकामांचे साहित्य बेकायदेशीररीत्या फेकून पसार होतात. पण हा कचरा आणि डेब्रिज उचलण्याची जबाबदारी पालिकेवर येऊन पडली आहे. सध्या मुंबईत नालेसफाई सुरू असून नाल्यांत रोज निर्माण होणारा गाळ वाहनांद्वारे उचलून त्याची मुंबईबाहेर विल्हेवाट लावण्यासाठी पालिका कंत्राटदारांवर ३३ कोटी ९७ लाख ९८ हजार ५७४ रुपये खर्च करणार आहे. एकूण एक हजार ३00 मेट्रिक टन गाळाची विल्हेवाट लावण्यात येणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages