एसटी कर्मचार्‍यांना १0 टक्के वाढीव महागाई भत्ता - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

एसटी कर्मचार्‍यांना १0 टक्के वाढीव महागाई भत्ता

Share This
मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com)
एसटीची प्रवासी भाडेवाढ करण्यास राज्य परिवहन प्राधिकरणाने नुकतीच परवानगी दिलेली असल्यामुळे महामंडळाच्या कर्मचार्‍यांना १0 टक्के वाढीव महागाई भत्ता मे २0१४च्या पगारापासून देण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे आणि उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक व्ही. एन. मोरे यांनी महामंडळाच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन कर्मचार्‍यांना वाढीव महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे.
महामंडळाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असताना कर्मचार्‍यांना वाढीव १0 टक्के महागाई भत्ता देण्याची मागणी एसटी कामगार संघटनेने केली होती. कर्मचार्‍यांना १0 टक्के वाढीव महागाई भत्ता दिल्यास महामंडळावर वर्षाला १00 कोटी रुपयांचे अतिरिक्त ओझे पडणार आहे. या वर्षी कर्मचार्‍यांना ८0 कोटी रुपये हा महागाई भत्ता म्हणून देण्यात आला आहे. कर्मचार्‍यांना महागाई भत्ता देण्यात यावा, या मागणीसाठी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे एसटी महामंडळाने कर्मचार्‍यांना १0 टक्के वाढीव महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. 

जानेवारी ते एप्रिल २0१४ या कालावधीच्या वाढीव महागाई भत्त्याबाबत राज्य शासनाच्या निर्णयानंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे महामंडळाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे. राज्य शासनाकडून महामंडळास सुमारे १८४0 कोटी रुपये येणे आहे. यापैकी काही रक्कम आल्यानंतर कर्मचार्‍यांना उर्वरित महागाई भत्ता देण्यात येणार आहे. संघटनेचे अध्यक्ष, जनरल सेक्रेटरी तसेच एसटी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास ४ जून रोजी धरणे आंदोलन करण्याचा इशारा एसटी कामगार संघटनेने दिला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages