देखभालीसाठी रस्ते पालिकेकडे सोपवण्याची महापौरांची मागणी अवास्तव - देवेंद्र आंबेरकर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

देखभालीसाठी रस्ते पालिकेकडे सोपवण्याची महापौरांची मागणी अवास्तव - देवेंद्र आंबेरकर

Share This
मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com)
पालिकेच्या ताब्यात असलेल्या रस्त्यांची अनेक वर्षांपासूनची दुरवस्था पाहता महापालिकेस त्यांच्या ताब्यात असलेल्या रस्त्यांची देखभाल व परिरक्षण करणेच साध्य होत नाही. असे असताना अन्य प्राधिकरणांच्या अखत्यारीतील रस्ते महापालिकेकडे देखभालीसाठी सोपवण्याची महापौरांची मागणी अवास्तव वाटते, असा टोला पालिकेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी लगावला आहे. 
एमएमआरडीएच्या अखत्यारीतील मिठी नदीतील गाळ पावसाळ्यापूर्वी महापालिका गेल्या दोन वर्षांपासून काढत आहे; पण या कामाचा मोबदला पालिकेला देत नाही, याकडे लक्ष वेधून विरोधी पक्षनेते म्हणाले, 'अन्य प्राधिकरणांकडे मनुष्यबळ नाही, त्यामुळे त्यांचे रस्ते दुरुस्त होत नाहीत. यामुळे पालिकेने त्यांच्या रस्त्यांच्या दुरुस्तीची जबाबदारी घ्यावी, ज्याप्रमाणे मिठी नदीची जबाबदारी घेतली जाते, त्याच धर्तीवर या अन्य प्राधिकरणांच्या रस्त्यांचीही जबाबदारी महापालिकेने घ्यावी.'

मुंबई महापालिकेच्या ताब्यात सुमारे एक हजार ९४१ किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. एमएमआरडीएकडे ४१.२५ किमीचे, बीपीटीकडे ६३ किमींचे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग व एमएसआरडीसीकडे ४९ किमी लांबीचे रस्ते आहेत. याचा अर्थ पालिकेच्या ताब्यात असलेल्या रस्त्यांच्या तुलनेत इतर प्राधिकरणांच्या ताब्यात केवळ १00 ते १५0 किमी लांबीचे रस्ते आहेत, असे आंबेरकर म्हणाले. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages