अग्निशमन दलाकडे ९0 मीटरपेक्षा जास्त उंचीची शिडी नाही - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अग्निशमन दलाकडे ९0 मीटरपेक्षा जास्त उंचीची शिडी नाही

Share This
मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com)
मुंबईत ४५ ते ६0 मजल्यांच्या उत्तुंग इमारती आहेत, पण त्याहीपेक्षा उंच म्हणजे १00 मजल्यांपेक्षा जास्त गगनचुंबी इमारती काही विकासक उभारू इच्छीत आहेत. पण या इमारतींना आगी लागल्या किंवा तेथे आपत्कालिन प्रसंग उद्भवल्यास बचावकार्यासाठी मुंबई अग्निशमन दलाकडे ९0 मीटरपेक्षा जास्त उंचीची शिडी नाही, अशी कबुली पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत दिली. 
अग्निशमन दल लवकरच ९0 मीटर उंचीची नवीन 'ब्राँको' शिडी घेणार आहे, तसा प्रस्ताव पालिकेने तयार केला आहे. अग्निशमन दलाकडे सध्या ४२ मीटर उंचीची शिडी असून, ती गेल्या १५ वर्षांपासून वापरात आहे. या शिडीच्या दुरुस्तीसाठी ३ कोटी २३ लाख रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे ही शिडी ज्या कंपनीकडून घेतली होती त्यांच्याकडूनच दुरुस्त करून घेतल्यास शिडीचे आयुर्मान ७ वर्षांनी वाढणार आहे. नव्या शिडीच्या खरेदीसाठी ७ कोटी रुपये खर्च येईल, असे देशमुख यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages