खारफुटीच्या संवर्धनासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणार - कुंटे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

खारफुटीच्या संवर्धनासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणार - कुंटे

Share This
मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) 
मुंबईत समुद्राच्या आसपास बर्‍याच प्रमाणात खारफु टीची वने असून त्या वनांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी पालिका प्रशासन या क्षेत्रातील शासकीय अधिकारी व तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. यासंदर्भात लवकरच संगणकीय सादरीकरण व संयुक्त आढावा बैठक तसेच प्राधिकरणाचे सदस्य आणि तज्ज्ञ अधिकार्‍यांसमवेत विभागांची संयुक्त पाहणी आयोजित करण्यात येईल, अशी माहिती पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी बुधवारी वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत सदस्यांना दिली.
कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकूण ३९ विषय मंजूर केले असून वृक्ष छाटणी आणि वृक्ष संवर्धनासाठी लागणार्‍या बाबींची पूर्तता करण्यात आली असल्याचेही आयुक्तांनी सदस्यांना सांगितले. 'आतापर्यंत संपूर्ण मुंबईत एक लाखापेक्षाही अधिक झाडांच्या फांद्यांची छाटणी केली असून झाडांच्या फांद्यांचा समतोल राखून वृक्ष छाटणी केली असल्याने येत्या पावसाळ्यात कमीत कमी वृक्ष उन्मळून पडतील, असा दावा पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे सहआयुक्त शिंदे यांनी केला. झाडांचे पुनरेपण करण्यास प्राधान्य देण्यात येत असून यासाठी नेमलेल्या कंत्राटदाराला पुनरेपण केलेली झाडे तीन वर्षे जगल्यानंतरच कंत्राटदारांचे पैसे देण्यात येतील, असेही शिंदे यांनी सदस्यांच्या विविध हरकतीच्या मुद्दय़ांना उत्तर देताना सांगितले. पश्‍चिम रेल्वेच्या हद्दीतील रेल्वे जमिनीलगत असलेल्या २९ वृक्षांना तोडण्याची परवानगी दिली असून ४0७ झाडांच्या फांद्या छाटण्यात आल्या असल्याचेही शिंदे यांनी या बैठकीत सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages