पालिकेत पुन्हा 'कंत्राटादार राज' अवतरणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेत पुन्हा 'कंत्राटादार राज' अवतरणार

Share This
मुंबई : विविध नागरी कामे करण्यासाठी पालिका प्रशासन राबवत असलेली सध्याची 'ई टेंडरिंग' पद्धत रद्द करून 'सीडब्ल्यूसी'च्या माध्यमातून ही कामे कंत्राटदारांची नेमणूक करून पूर्ण करावीत, अशी आग्रही मागणी स्थायी समितीच्या सदस्यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत केली. पालिकेतील सत्तारूढ पक्ष यासाठी आग्रही आहे. मात्र काही सदस्यांनी ही कामे 'ई टेंडरिंग' आणि 'सीडब्ल्यूसी'च्या माध्यमातून निम्मी-निम्मी करावीत, असेही सांगितले. विधानसभेच्या आचारसंहितेच्या बागुलबुवामुळे नगरसेवक धास्तावल्याने ही मागणी जोर धरत आहे. पालिकेतील सभागृह नेत्या तृष्णा विश्‍वासराव यांनी त्याला दुजोरा दिला. पालिकेत पुन्हा 'कंत्राटदार राज' अवतरण्याची चिन्हे यामुळे दिसत आहेत. शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत तातडीची कामे सीडब्ल्यूसीच्या माध्यमातून पूर्ण करावीत, अशी जोरदार मागणी करण्यात आली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याआधीच ही कामे 'सीडब्ल्यूसी'च्या माध्यमातून पूर्ण करावीत, अशी मागणी करण्यात आली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages