महायुतीला आघाडीपेक्षा 15.03 टक्के जास्त मते - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महायुतीला आघाडीपेक्षा 15.03 टक्के जास्त मते

Share This
मुंबई - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप, स्वाभिमानी, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) महायुतीने 48 पैकी 42 मतदारसंघांत विजय संपादन करून कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला जोरदार धक्का दिला असून, युतीला या निवडणुकीत 15.03 टक्के जास्त मते मिळाली आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना 50.2 टक्के, तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला 34.1 टक्के मते मिळाली आहेत. आघाडीपेक्षा महायुतीच्या उमेदवारांना 16.1 टक्के जास्त मते मिळाली आहेत. 


निवडणुकीत भाजपला 23, शिवसेनेला 18, स्वाभिमानी पक्षाला एक जागा मिळाली, तर कॉंग्रेसला फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी कॉंग्रेसला चार जागा मिळाल्या आहेत. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत आघाडीला 38.89 टक्के मिळाली होती, तर युतीला 35.17 टक्के मिळाली होती. हा फरक केवळ 3.72 टक्के इतका होता. त्या वेळी आघाडीला 25, तर युतीला 20 जागा मिळाल्या होत्या.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages