रेल्वे समस्या सोडवण्यासाठी सोमय्या सक्रिय - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रेल्वे समस्या सोडवण्यासाठी सोमय्या सक्रिय

Share This
मुंबई - कोकण रेल्वे अपघातानंतर अपघातग्रस्तांना मदत देण्याबाबत; तसेच पावसाळ्यात रेल्वेसेवेत निर्माण होणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आज खासदार किरीट सोमय्या यांनी रेल्वे विभागीय व्यवस्थापकांची भेट घेतली. मुंबईतील रेल्वेच्या फलाटांची उंची वाढविणे, कोकण रेल्वेच्या अपघातानंतर दुर्घटनाग्रस्त लोकांना मदत करणे, पावसाळ्यात रेल्वेसेवा खंडित होऊ नये, यासाठी उपाययोजना राबवणे या मागण्यांबाबतचे निवेदन सोमय्या यांनी रेल्वे महाव्यवस्थापकांना दिले. रेल्वे मंत्रालयातून आपण लवकरच रेल्वेसाठी विशेष निधी मंजूर करून घेणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages