निवडणुकीत १,६५२ पक्षांना भोपळा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

निवडणुकीत १,६५२ पक्षांना भोपळा

Share This
नवी दिल्ली -  देशातील सोळावी निवडणूक सर्वार्थाने लक्षणीय ठरली. तीस वर्षाच्या कालावधीनंतर प्रथमच एका राजकीय पक्षाला बहुमत मिळाले आहे. तसेच अनेक आश्चर्यकारक बदलही दिसून आले. या निवडणुकीत देशात भाजपच्या लाटेमुळे बसपा, द्रमुक आणि सीपीआय यांसारख्या एक हजार ६५२ पक्षांना लोकसभेत भोपळाही फोडता आला नाही.
निवडणूक लढवणा-या आठ हजार २०० उमेदवारांपैकी ३५ पक्षांच्या ५४१ उमेदवारांनी विजय मिळवला तर केवळ तीन अपक्ष उमेदवार खासदार म्हणून निवडून आले. बहुजन समाज पक्ष, द्रमुक, नँशनल कॉन्फरन्स, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांसह १,६५२ पक्षांना लोकसभेत एकही जागा जिंकता आलेली नाही. तर राष्ट्रीय लोक दल आणि आसाम गण परिषद या पक्षाचाही एकही खासदार निव़डून आलेला नाही.
देशात एक हजार ६८७ पक्ष नोंदणीकृत आहेत. देशातील एकूण ८२०० उमेदवार यावेळी निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी पाच हजार सात उमेदवार हे विविध पक्षांचे उमेदवार होते तर इतर उमेदवारांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages