फेरीवाल्यांना 20 वर्षांसाठी परवाना - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

फेरीवाल्यांना 20 वर्षांसाठी परवाना

Share This
मुंबई - मुंबई मध्ये वर्षांनुवर्षे रस्ते व पदपथ अडवून बसलेल्या फेरीवाल्यांची मक्तेदारी नवीन फेरीवाला धोरणात मोडीत निघणार आहे. या धोरणानुसार फेरीवाल्यांना फक्त 20 वर्षांसाठी परवाना देण्यात येणार आहे. मुदत संपल्यावर परवाना रद्द करण्यात येणार आहे अशी माहिती पालिकेकडून मिळाली आहे. 
धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महापालिका प्रशासनाने धोरणाचा मसुदा तयार केला आहे. या नव्या धोरणानुसार फेरीवाल्यांना 20 वर्षांसाठी नवीन परवाने देण्यात येणार आहेत. हा नियम फिरत्या आणि एकाच जागी बसणाऱ्या या दोन्ही प्रकारच्या फेरीवाल्यांना लागू आहे. फेरीवाल्याने 20 वर्षे व्यवसाय केल्यावर त्याचा आर्थिक स्तर उंचावला असेल, तर त्याचा परवाना रद्द करून दुसऱ्या गरजू व्यक्तीला देण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 

सध्या फेरीवाल्यांच्या नोंदणीकृत संघटनांबरोबर या मसुद्याबाबत चर्चा सुरू आहे. हा मसुदा महापालिकेच्या महासभेतही मांडला जाण्याची शक्‍यता आहे. नव्या धोरणात परवानाधारकाचा मृत्यू झाल्यास तो परवाना त्याच्या वारसाला मिळेल; मात्र 20 वर्षांनंतर परवाना रद्द करण्यात येणार असल्याने फेरीवाल्याची जागेवरील मक्तेदारी संपेल. फेरीवाल्यांना 10 वर्षांनी या परवान्याचे नूतनीकरण करावे लागणार आहे; मात्र नागरिकांकडून फेरीवाल्यांबाबत तक्रार आल्यास त्याची शहनिशा करून कारवाई करण्यात येईल. त्याला दंड केला जाईल किंवा परवानाही रद्द होईल.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages