मरे करणार हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मॉनिटरिंग - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 May 2014

मरे करणार हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मॉनिटरिंग

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वे मार्गावरील रुळांना तडे गेल्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत. परिणामी, उपनगरीय वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने २७ मे रोजी रात्री हार्बर मार्गावर सीएसटी-पनवेल आणि ट्रान्स हार्बर मार्गावर २८ मे रोजी रात्री नेरूळ ते ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर ट्रॅकचे मॉनिटरिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. हार्बर मार्गावर सीएसटी-पनवेल स्थानकांदरम्यान २७ मे (मंगळवारी) रोजी डाऊन मार्गावर रात्री १ वाजून १0 मिनिटांनी, तर अप मार्गावर २ वाजून ३0 मिनिटांनी आणि ट्रान्स हार्बर मार्गावर २८ मे (बुधवारी) रोजी नेरूळ ते ठाणे दरम्यान डाऊन मार्गावर रात्री ११ वाजून ३0 मिनिटांनी, तर अप मार्गावर रात्री १२ वाजून १0 मिनिटांनी मॉनिटरिंग ट्रेन चालवण्यात येणार आहे. ही मॉनिटरिंग ट्रेन नॉन स्टॉप असणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS