घाटकोपर, कुर्ल्याचा पाणीपुरवठा 24 तास बंद राहणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

घाटकोपर, कुर्ल्याचा पाणीपुरवठा 24 तास बंद राहणार

Share This
मुंबई - घाटकोपरमधील जागृती नगरमध्ये बुधवारी (ता. 28) सकाळी 10 वाजल्यापासून 72 इंच व्यास जलवाहिनीच्या पर्यायी जोडणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. ते गुरुवारी (ता. 29) पूर्ण होईल. यामुळे घाटकोपर आणि कुर्ल्याच्या काही भागांतील पाणीपुरवठा 24 तास बंद ठेवण्यात येणार आहे. 
या कामामुळे कुर्ल्यातील सानेगुरुजी नगर, अशोक नगर, हिमालय कॉ-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, जंगलेश्‍वर महाराज रोड, मोहिली पाईपलाईन रोड येथील आणि घाटकोपरमधील आनंद नगर, विक्रोळी पार्क साईट, रामनगर, गोळीबार रोड, भीमनगर, कातोडीपाडा, भटवाडी, बर्वेनगर, सिद्धार्थ नगर, चिरागनगर, पारशीवाडी, काजू टेकडी, सर्वोदय नगर आणि नारायण नगर येथे या वेळेत पाणीपुरवठा होणार नाही, असे पालिकेने कळविले आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages