उद्धव ठाकरेंच्या ट्रस्टचा गाळा पालिका तोडणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 May 2014

उद्धव ठाकरेंच्या ट्रस्टचा गाळा पालिका तोडणार

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विश्‍वस्त असलेल्या "अवनी ट्रस्ट'चे दादर येथील केशवसुत पुलाखालील झुणका-भाकर केंद्र बंद करण्यात आले आहे. महापालिका सोमवारी केंद्राचे बांधकाम तोडणार आहे. या पुलाखालील गाळे अडचणीचे असल्याने ते तोडावेत, अशी याचिका मनसेचे नगरसेवक सुधीर जाधव यांनी न्यायालयात दाखल केली होती. त्यानुसार न्यायालयाने हे गाळे हटवण्याचे निर्देश महापालिकेला दिले होते. 


या पुलाखाली महापालिकेच्या सहा चौक्‍या होत्या. त्या हटवल्यानंतर महापालिकेने हे गाळे हटवण्यास सुरुवात केली. यात ठाकरे आणि माधव कोकणे विश्‍वस्त असलेल्या अवनी ट्रस्टचे झुणका-भाकर केंद्रही होते. या केंद्रालाही महापालिकेने नोटीस दिली होती. त्यानुसार हे केंद्र बंद करून तेथील सामान हटवण्यात आले आहे. ट्रस्टने स्वत:च हे केंद्र बंद केल्यामुळे सोमवारी महापालिका केंद्राचे बांधकाम तोडणार आहे. अवनी ट्रस्टला नोटीस दिल्यानंतर त्यांनी मंगळवारी गाळा रिकामा केला.दादर चर्मकार विक्रेता संघाला दिलेले दोन गाळे रिकामे करणे बाकी आहे. त्यावरही लवकरच तोडगा काढण्यात येईल, असे सहायक आयुक्त शरद उघडे यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS