25 टक्के प्रवेशांची दुसरी फेरी 23 मेपासून - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

25 टक्के प्रवेशांची दुसरी फेरी 23 मेपासून

Share This
मुंबई - शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये एन्ट्री लेव्हलला दिल्या जाणाऱ्या 25 टक्‍क्‍यांतल्या ऑनलाईन प्रवेशांची दुसरी फेरी 23 मेपासून सुरू होणार आहे. 23 ते 30 मेपर्यंत या फेरीसाठी इच्छुक पालकांनी ऑनलाईन अर्ज भरावयाचे आहेत. त्यांची लॉटरी 2 जून रोजी जाहीर होणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे उपायुक्त मोहन अडताणी यांनी दिली. पहिल्या फेरीतल्या लॉटरीत प्रवेश न मिळालेले 3,195 विद्यार्थी आणि अन्य या दुसऱ्या फेरीसाठी अर्ज करू शकतात. 

पहिल्या फेरीत मुंबईतल्या खासगी शाळांमधल्या 25 टक्‍क्‍यांसाठी पात्र 312 शाळांतील एकूण आठ हजार 223 जागांसाठी सहा हजार 575 अर्ज आले. यापैकी केवळ 57 शाळांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक अर्ज आल्याने केवळ या 57 शाळांच्या 1569 जागांसाठी आज लॉटरी काढण्यात आली. उर्वरित 171 शाळांमधील 1811 अर्जदार मुलांना थेट प्रवेश देण्यात आले. लॉटरीसाठी 1569 जागांसाठी 4,764 अर्ज आले होते. उर्वरित 3,195 जण प्रवेशापासून वंचित राहिले होते. त्या मुलांसाठी दुसरी फेरी होणार आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages