२० मे रोजी दादर ते चैत्यभूमी "आक्रोश मोर्चा" - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

२० मे रोजी दादर ते चैत्यभूमी "आक्रोश मोर्चा"

Share This
नितीन आगे ह्या १७ वर्षाच्या दलित युवकाची जातीय द्वेषातून निर्घृण हत्या करण्यात आली. जालाना जिल्ह्यात मनोज कसाब या दलित सरपंचाची हत्या करण्यात आली आणि अत्ताच गोंदिया जिल्ह्यात घडलेले  संजय  खोब्रागडे यांचे जातीय द्वेषातून झालेले जाळीतकांड आणि जळगाव येथे जातीय द्वेषातून जाळलेली घरं या सर्व वाढत्या जातीय हत्याकांडांच्या विरोधात दलित अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने मंगळवार २० मे रोजी दुपारी ३ वाजता दादर हनुमान मदिर ते चैत्यभूमी असा "आक्रोश मोर्चा" काढण्याचे ठरले आहे. पुरोगामी विचाराच्या अनेक संघटना ह्यात सामील झाल्या आहेत. मोर्च्याचे नेतृत्त्व प्रकाश आंबेडकर, प्रकाश  रेड्डी, पुष्पा भावे हे करतील असे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages