पालिकेच्या अधिकार्‍यांच्या बदल्या - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 May 2014

पालिकेच्या अधिकार्‍यांच्या बदल्या

मुंबई : आरक्षण, सेवाज्येष्ठता आणि कार्यक्षमता यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी मंगळवारी तब्बल एक डझनहून अधिक अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या. त्यापैकी उपायुक्त रमेश पवार यांची पदावनती करण्यात आली असून त्यांना बाजार विभागाचे सहाय्यक आयुक्त केले आहे. उपायुक्त पदाच्या वरिष्ठ अधिकार्‍याची पदावनती करण्याची ही घटना महापालिकेत प्रथमच झाली आहे. पवार यांच्या पदावनतीमुळे सीताराम कुंटे यांच्याविरोधात अविश्‍वासाचा ठराव आणण्याची तयारी पालिकेतील काँग्रेस पक्षाने केली आहे. त्याला कुंटे यांना सामोरे जावे लागेल.
अधिकार्‍यांचे सध्याचे पद बदली, पदोन्नती व पदावनती राम धस ( प्रमुख लेखापाल, वित्त) उपायुक्त - ३, पदोन्नती
ए. एल. वागराळकर (हंगामी उपायुक्त) उपायुक्त २, पदोन्नती
रमेश पवार (हंगामी उपायुक्त) सहाय्यक आयुक्त (बाजार), (पदावनती) 
सुनील धामणे (उपायुक्त) हंगामी उपायुक्त (पदावनती)
राजेश काटकर (सहाय्यक आयुक्त) सहाय्यक आयुक्त (अतिक्रमण)
विजयानंद बोले (सहाय्यक आयुक्त) सहाय्यक आयुक्त (अतिक्रमण)
विश्‍वास मोटे ( सहाय्यक आयुक्त) सहाय्यक आयुक्त (अतिक्रमण)
एस. पी. कालपे ( कार्यकारी अभियंता) सहाय्यक आयुक्त (बी) पदोन्नती
किशोर गांधी (सहाय्यक आयुक्त) सहाय्यक आयुक्त, आर-मध्य
एस. आर. गायकवाड (कार्य. अभियंता) सहाय्यक आयुक्त, आर-दक्षिण
एच. एस. निकम ( प्रमुख लेखापाल) लेखापाल (वित्त) पदावनती
हेमलता येखे ( उपप्रमुख लेखापाल) हंगामी प्रमुख लेखापाल,कोषागार
केवलानंद बर्वे (प्रमुख लेखापाल, कोषागरे) प्रमुख लेखापाल (पाणीपुरवठा)
उपायुक्त पवार व 
धामणे यांची पदावनती

Post Bottom Ad

JPN NEWS