मुंबई - न्यायालय आणि आयुक्तांनी दिलेल्या आदेशानंतरही मागण्यांबाबत अंमलबजावणी होत नसल्याने के.ई.एम. रुग्णालयातील कामगार आणि कर्मचारी 5 मेपासून आंदोलन करणार आहेत. तीन ते चार दिवस हे आंदोलन केले जाणार आहे.
के.ई.एम.च्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांपैकी काही मागण्या अपूर्ण आहेत, तर काही मागण्यांकडे प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे प्रशासनावरील असंतोषामुळे हे आंदोलन करत असल्याचे के.ई.एम. रुग्णालय कर्मचारी युनियनचे चिटणीस महेश दळवी यांनी सांगितले. संपामुळे रुग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून आंदोलनाचा मवाळ मार्ग स्वीकारल्याचे दळवी म्हणाले; मात्र त्याबाबत अधिक बोलण्यास नकार दिला. के.ई.एम.च्या अधिष्ठात्या शुभांगी पारकर यांच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजीने आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचे दळवी यांनी स्पष्ट केले. यानंतरही प्रशासन बधले नाही, तर संप पुकारण्यात येईल, अशी माहिती दळवी यांनी दिली.
मागण्या
300 कर्मचाऱ्यांना अद्याप ओळखपत्र नाही
80 टक्के अपंग कर्मचाऱ्याला दोनच शिफ्ट
50 टक्के सर्व्हिस क्वार्टर्स आजही रिकाम्या
2011 सालचा बोनस लाभ मिळावा
25 टक्के कर्मचारी बोनसपासून वंचित