मुंबई - वरळी येथील कॅम्पा कोलासंदर्भात पालिका आणि रहिवाशांनी एकत्र बसून तोडगा काढावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार पालिकेच्या स्थायी समितीची विशेष सभा बोलावून या संदर्भात तातडीने निर्णय घ्या, असे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना दिले आहेत.
कॅम्पा कोलामध्ये राहणाऱ्या रहिवाशांना सर्वोच्च न्यायालयाने 31 मेपर्यंत मुदत दिली आहे. 9 मेपासून सर्वोच्च न्यायालयाची उन्हाळी सुट्टी सुरू होत असल्यामुळे कामकाज बंद राहणार आहे. त्यामुळे 9 मेपर्यंत याबाबत तोडगा निघणे आवश्यक आहे, असे स्थायी समितीच्या सदस्यांचे मत असल्याचे फणसे यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.