एलटीटी ते कल्याणदरम्यान डीसी टू एसी पूर्ण
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील लोकमान्य टिळक टर्मिनस ते कल्याण स्थानकांदरम्यानच्या डीसी (डायरेक्ट करंट)-एसी (अल्टरनेट करंट) विद्युत रूपांतरणाचे काम पूर्ण झाले आहे. या कामामुळे ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यानचा प्रवास जलद झाला आहे. या मार्गावर गाड्यांचा वेग वाढला असून प्रवासाच्या वेळेत बचत होत असली तरी वेळापत्रकावर मात्र वेगळय़ाच कारणाने परिणाम होत आहे. त्यामुळे वेळापत्रक बिघडत आहे.
देशात सर्वत्र एसीवर लोकल-मेल-एक्स्प्रेस चालतात. फक्त मध्य रेल्वे मार्गावर सीएसटी ते कल्याणपर्यंतच्या गाड्या डीसीवर चालतात. त्यासाठी मरेने विशेष ब्लॉक घेऊन ठाणे-एलटीटी पाचवा, सहावा मार्ग, ठाणे ते कल्याणपर्यंतच्या एसी विद्युत परावर्तनाचे काम पूर्ण केले. मात्र त्यामुळे मरेवर वेगळीच अडचण निर्माण झाली आहे. यापुढे फक्त डीसीवर चालणार्या गाड्यांनाच ठाण्यापुढे नेणे कठीण ठरणार आहे. मरेवर सध्या १0 गाड्या डीसी करंटवर धावतात. त्यामुळे नव्या परावर्तनानंतर त्या गाड्या ठाण्यापर्यंतच जाऊ शकतात. साधारणपणे एका गाडीच्या सहाय्याने दिवसभरात किमान १0 फेर्या चालवल्या जातात. त्यानुसार, सुमारे २२0 फेर्यांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.

डीसी गाड्यांचा वापर ठाणे स्थानकापुढे करता येणार नसल्याने वेळापत्रक बिघडत आहे. सीएसटी-ठाणे मार्गावर डीसी गाड्यांच्या २१८ फेर्या होतात. त्यात सीएसटी-ठाणे मार्गावर १४९, सीएसटी-कुर्ला मार्गावर ५२, सीएसटी-घाटकोपर मार्गावर ४ तर दादर-ठाणे मार्गावर १३ गाड्यांचा समावेश आहे. परावर्तनामुळे ठाण्याच्या पुढील मार्गावर डीसी प्रवाहावरील गाड्या चालवणे शक्य नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनासमोर वेगळीच समस्या उभी ठाकली आहे. सीएसटीपर्यंतचा संपूर्ण भाग एसी विद्युत प्रवाहावर करण्यासाठी अजून मेपर्यंतचा कालावधी लागणार आहे. त्यासाठी डीसी-एसी अशा दोन्ही प्रवाहांवर चालणार्या गाड्यांचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आव्हान रेल्वेसमोर उभे आहे. मरेवर डीसी-एसीवर चालणार्या गाड्यांची संख्या ४५ तर परेवर ६५ आहे.
मध्य रेल्वे फेर्या १६१८
मेन लाइन - ८२५ फेर्या१२ डब्यांच्या ८0९ फेर्या
१५ डब्यांच्या १६ फेर्या
गाड्यांची संख्या ७५
डीसीवर चालणार्या १0
एसी-डीसीवर चालणार्या - ६५