माध्यमिक शाळांतील आठवीचे वर्ग बंद पडण्याच्या मार्गावर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

माध्यमिक शाळांतील आठवीचे वर्ग बंद पडण्याच्या मार्गावर

Share This
मुंबई - शिक्षण हक्क कायद्यातल्या तरतुदीनुसार सातवीपर्यंतच्या प्राथमिक शाळांनी आठवीचे वर्ग सुरू केले आहेत. त्याचा परिणाम माध्यमिक शाळांवर झाल्याने तेथील वर्ग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. आठवी आणि पाचवीच्या वर्गांसंदर्भातील सरकारी निर्णयाचा अनेक महापालिका आणि पालिका शाळा चुकीचा अर्थ काढत असल्याने हा प्रकार घडत असल्याचा आरोप शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी केला आहे. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी किंवा तो रद्द करावा, अशी मागणी त्यांनी शालेय शिक्षण विभागाकडे केली आहे. 
सरकारी आदेशात एक किलोमीटर परिसरात पाचवीचा वर्ग उपलब्ध नसेल, तर चौथीपर्यंतच्या शाळांनी पाचवीचा वर्ग सुरू करावा आणि तीन किलोमीटर परिसरातील शाळांत आठवीचा वर्ग नसल्यास सातवीपर्यंतच्या शाळांमध्ये आठवीचा वर्ग सुरू करावा, असे म्हटले आहे; मात्र या आदेशाचे उल्लंघन करून अनेक पालिका आणि जिल्हा परिषद शाळांनी आठवीचे वर्ग सुरू केले आहेत. परिणामी त्या परिसरातल्या माध्यमिक शाळांमधले आठवीचे वर्ग ओस पडले आहेत. 2013-14 या शैक्षणिक वर्षात नवी मुंबई महापालिकेने 55 शाळांमध्ये आठवीचे वर्ग सुरू केले. त्यामुळे त्या परिसरातील माध्यमिक शाळांमधले आठवीचे वर्ग बंद झाले. यामुळे शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. हे प्रकार थांबवण्यासाठी सरसकट सर्व उच्च प्राथमिक शाळांना आठवीचे वर्ग सुरू करण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी आमदार मोते यांनी केली आहे.


Post Bottom Ad

JPN NEWS

Pages