मरेवर एटीव्हीएमची संख्या वाढतेय - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मरेवर एटीव्हीएमची संख्या वाढतेय

Share This
मुंबई : लोकल प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी खिडक्यांवर जास्त वेळ रांगेत उभे राहावे लागू नये म्हणून रेल्वे प्रशासनाने एटीव्हीएम लावली आहेत. गेल्या काही महिन्यांत १३0 नवीन एटीव्हीएम मशीन्स मध्य रेल्वे मार्गावर लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील एटीव्हीएमची एकूण संख्या आता ३८५ झाली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने तिकीट काढण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यामध्ये एटीव्हीएम कूपन्स, सीव्हीएम कूपन्स आणि जीटीबीएसचा समावेश आहे.
सीव्हीएम कूपन्स मार्च २0१५ मध्ये रेल्वे प्रशासनातर्फे बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी एटीव्हीएमचा जास्तीत जास्त वापर करावा, यासाठी एटीव्हीएमची संख्या रेल्वे स्थानकांवर वाढविण्यात येत आहे. त्यामुळे सध्या मध्य रेल्वे मार्गावर ३८५ एटीव्हीएम लागले असून जीटीबीएसची संख्या १६४ झाली आहे.तर सीव्हीएम कूपन्सच्या विक्रीमध्ये काही प्रमाणात घट आली आहे. जीटीबीएस आणि एटीव्हीएमची संख्या वाढल्यामुळे सध्या तिकीट खिडक्यांवर (यूटीएस) जाऊन तिकीट काढणार्‍या प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे. तिकीट खिडक्यांवर जाऊन तिकीट काढणार्‍यांची संख्या ६५ टक्क्यांवरून ५५ टक्क्यांवर आली आहे. मध्य रेल्वे मार्गावर दररोज ९.५ लाख तिकिटांची विक्री केली जाते. त्यामध्ये जीटीबीएस आणि एटीव्हीएमचे योगदान ३७ टक्के आहे, तर ५.५ टक्के प्रवासी सीव्हीएम कूपन्सचा वापर करतात. त्यामध्ये २ टक्के एसपीटीएमचा समावेश आहे. तिकीट खिडक्यांवर जाऊन तिकीट काढणार्‍या
प्रवाशांच्या संख्येत १0 टक्क्यांनी घट झाली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages