मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com)
राज्यात काही जण स्वतःच मुख्यमंत्री होण्याची इच्छा बाळगून आहेत, पण "मी मुख्यमंत्री व्हावं, अशी कार्यकर्त्यांचीच इच्छा आहे,' असं सांगत आपण मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. मुंबई महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या नालेसफाईचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
लोकसभा निवडणुकीतल्या विजयानंतर मुंबई शहरात शिवसैनिकांनी "उद्धव यांनी मुख्यमंत्री व्हावं,' अशा आशयाचे बॅनर्स लावले होते. त्यावर "दिल्लीत मोदी सरकार, तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकार' असा मजकूर छापला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू झाली होती. याबाबत उद्धव ठाकरे यांना विचारले असता, ते म्हणाले की, शिवसैनिकांचे माझ्यावर खूप प्रेम आहे, ते असेच राहावे. माझी वाटचाल ही कार्यकर्त्यांच्या प्रेमाच्या बळावर सुरू आहे. पण काहीजण स्वतःच मुख्यमंत्री व्हायला निघालेत, असा टोला त्यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुती सत्तेवर आल्यास संपूर्ण राज्य टोलमुक्त करू, असं उद्धव यांनी सांगितलं. महसुलासाठी इतरही अनेक मार्ग असल्याचे उद्धव म्हणाले. या वेळी ठाकरे यांनी मुंबईतल्या नालेसफाईचा आढावा घेतल्याचेही सांगितले.